कर्मचारी कार्यालयात वेळेवर हजर होण्यासाठी बुलढाणा तहसीलदारांनी लढवली अनोखी शक्कल..

 

त्या तहसिलदाराच्या अनोख्या शक्कलमुळे कर्मचाऱ्यांची वेळेची नियमावली सुधारली

 

वार्तापत्र न्युज –  आजच्या दैनंदिन युगामध्ये शासकीय कर्मचारी वेळेवर हजर नसतात त्यामुळे गरजु लाभार्थ्यांची कामे वेळेवर होत नसल्याबाबतच्या अनेक तक्रारी या प्रसारमाध्यमातुन प्रसारीत होत असतात परंतु. या कार्यालयीन कर्मचाऱ्यांना वेळेचे व प्रशासनाच्या नियमावलीचे वळण लावण्याकरीता महाराष्ट्र राज्यातील बुलढाणा जिल्ह्यातील बुलढाणा तहसिलदार यांनी नवी शक्कल लढवली आहे.

 

त्यामुळे तहसिल कार्यालयात असलेल्या व विविध सेवा देणाऱ्या सर्वच कर्मचारी तसेच पदाधिकाऱ्यांना वेळेवर उपस्थित राहण्याची नियमावलीच जोडली आहे.

शासकीय कार्यालयाच्या बाबतीत सांगायचे झाले तर कर्मचारी उशिरा येतात किंवा हजर राहत नसल्याची ओरड केली जात असते. परंतु तहसिल कार्यालयामध्ये सर्वच कर्मचारी व अधिकारी हे वेळेत हजर व्हावे याकरीता बुलढाणा तहसिलदार विठ्ठल कुमरे यांनी एक नवी संकल्पना राबवित  नवी सुरुवात केली आहे. शासकीय कार्यालयाच्या वेळा या शासकीय नियमानुसार सकाळी  दहा ते सायंकाळी सहा पर्यंत असतात.

 

म्हणुन बुलढाणा तहसिल कार्यालयातील कर्मचारी हे  तहसिलदारासह सर्व कार्यरत कर्मचारी हे पावणेदहा वाजता तहसिल कार्यालयात हजर होतात. त्यांनतर 10 वाजताच्या सुमारास  तहसिलदार यांच्या दालनामध्ये महाराष्ट्र गिताने दिवसाच्या कामकाजाची सुरुवात केली  जाते. ज्यामुळे कर्मचाऱ्यांना एक वेगळी उर्जा प्राप्त होते. त्या अनोख्या उपक्रमामुळे सर्व कर्मचारी वेळेवर कार्यालयात हजर होत असल्याने  बुलढाणा तालुक्यतील विशेषतः ग्रामीण भागातून येणाऱ्या  नागरिकांची कामे जलद गतीने होत असल्याच्या सर्व सामान्यांच्या प्रतिक्रीया उमटत आहे. तहसिलदार विठ्ठल कुमरे यांनी ही संकल्पना राबविली असून बुलढाणा तहसिल कार्यालयाला एक नवे वळण लावत वेळेच्या व्यवस्थापनावर कार्य कुशलता दाखविली असल्याने त्यांच्या या कार्य कुशलता ही नक्कीच अभिमानस्पद आहे.

राज्यातील इतर तहसिल व प्रशासकीय कार्यालयात राबवावी अशी संकल्पना

बुलढाणा तहसिलदार यांनी सकाळी पावणे दहा च्या सुमारास कार्यालयामध्ये महाराष्ट्र गित गावून कार्यालयीन कामकाज सुरु करण्याची संकल्पना राबविल्याने  तहसिल कार्यक्षेत्रात असलेल्या नागरिकांच्या कामाची गती वाढली असून कामे ही सुध्दा वेळेत होत आहे. तरी राज्यातील सर्वच तहसिलदार यीनी तसेच प्रशासकीय स्तरावर असलेल्या प्रत्येक कार्यालय प्रमुखाने हा उपक्रम राबविल्यास प्रशासन सेवेत असलेल्या सर्वच कर्मचाऱ्यांना कामाची तत्परता जाणवेल. आणि नागरिकांच्या कामांना गती देवून वेळेत कामे झाल्याचा मनस्वी आनंद हा भारतीयांच्या चेहऱ्यावर  पहावयास मिळेल.

 

शाळेतील विद्यार्थ्यांप्रमाणे दररोज सकाळी घेतले जाते महाराष्ट्र गीत..

बुलढाणा तहसिलदार यीनी ही संकल्पना राबवित असतांना प्रत्येक कर्मचाऱ्यांनी सकाळी पावणे दहा वाजता तहसिल कार्यालयात हजर राहून तहसिलदार यांच्या कार्यालयाच्या दालनामध्ये महाराष्ट्र गीत गायनाचे नियोजन केले असल्याने शाळेतील विद्यार्थ्यांप्रमाणे सर्वच कर्मचारी या गीत गायनाला उपस्थित लावतात. त्यात प्रामुख्याने तहसिलदार सुध्दा  उपस्थित असतात. त्यामुळे शालेय विद्यार्थ्यांच्या शिस्तीचे अनुशासन प्रशासकीय कार्यलयात होत असल्याने त्याची कर्तव्य तत्परता ही चर्चेची ठरू लागली आहे.

 

Leave a Comment